Ladki Bahin Yojana Money Not To Be Recovered : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra) लाभार्थी महिलांसाठी मोठी खुशखबर आहे. महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला सन्मान निधी परत घेतला जाणार नाही, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे.
राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू केली. याद्वारे २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये सन्मान निधी दिला जात आहे. मात्र, पडताळणीत काही अपात्र लाभार्थ्यांचा समावेश असल्याचे आढळले. यामुळे शासनाने योजनेतील अपात्र महिलांना निधी देणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
बँक खात्यातील पैसे सुरक्षित
Majhi Ladki Bahin Yojana Recovery : महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट केले आहे की, जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान जमा झालेला निधी लाभार्थी महिलांकडून सक्तीने परत घेतला जाणार नाही. त्यामुळे माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana,) सुरू झाल्यापासून निधी मिळालेल्या अपात्र महिलांना दिलासा मिळाला आहे.
🔴 हेही वाचा 👉 सोन्याचा आजचा भाव (8 फेब्रुवारी 2025).
अपात्र लाभार्थींना योजनेतून वगळले जाणार
शासन निर्णयानुसार, २८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ रोजी जाहीर केलेल्या आदेशानुसार अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे. जानेवारी २०२५ पासून अशा महिलांना सन्मान निधी मिळणार नाही.
महिला सशक्तीकरणासाठी सरकार कटिबद्ध
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत सरकार ठाम असून, पात्र महिलांना निधी देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले. राज्यातील महिलांना आर्थिक मदतीचा फायदा मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अस अदिती तटकरे म्हणाल्या.
🔴 नोकरी 👉 महाराष्ट्र पोलीस भरती 2025: 10,000 पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार.