Bandhkam Kamgar Yojana Online Portal Reopens After 5 Months | 05 फेब्रुवारी 2025 – महाराष्ट्रातील हजारो बांधकाम कामगारांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. तब्बल पाच महिन्यांपासून बंद असलेले बांधकाम कामगार योजनेचे (Bandhkam Kamgar Yojana) ऑनलाइन अर्ज पोर्टल अखेर सुरू करण्यात आले आहे. पुणे, मुंबई आणि नागपूर येथे झालेल्या आंदोलनानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (Maharashtra construction workers’ online portal reopens after 5 months).
कामगारांना मिळणार पुन्हा लाभ
बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून अनेक वर्षे कामगारांना विविध योजना (Bandhkam Kamgar Yojana Maharashtra) मिळत होत्या. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या निर्णयामुळे कामगारांना मोठे नुकसान सहन करावे लागत होते.
कामगार संघटनांनी हा मुद्दा सरकारपुढे वारंवार मांडला. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्राचे नेते काशिनाथ नखाते यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर ही अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे आता बांधकाम कामगारांना पूर्वीप्रमाणे विविध सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे.
ऑनलाइन पोर्टल सुरू झाल्यानंतर बांधकाम कामगारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. त्यांनी एकमेकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
कामगारांनी आंदोलन का केले?
- मागील पाच महिन्यांपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आली होती.
- अर्ज करण्यासाठी कामगारांना खासगी सुविधा केंद्रांवर जावे लागत होते.
- तासनतास रांगेत उभे राहूनही अर्ज प्रक्रिया पूर्ण होत नव्हती.
- सुरक्षा साधने, शिष्यवृत्ती, विवाह अनुदान, प्रसूती अनुदान, गृहप्रकल्प अनुदान यांसारख्या योजना ठप्प झाल्या होत्या.
या सर्व अडचणींमुळे अखेर कामगार संघटनांनी राज्यभर आंदोलन छेडले. पुणे आणि मुंबई येथे दोन मोठ्या इशारा बैठका घेण्यात आल्या होत्या.
आता कामगारांना अर्ज कसा करता येईल?
- नवीन अर्ज आणि नूतनीकरण पुन्हा ऑनलाइन करता येणार.
- अर्ज प्रक्रिया पूर्वीसारखी सोपी आणि जलद करण्यात आली आहे.
- कोणत्याही मध्यस्थांशिवाय थेट पोर्टलवर अर्ज करता येणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 बांधकाम कामगारांनी आर्थिक मदतीसाठी त्वरित करा नोंदणी.
कामगारांनी आंदोलन करून मिळवला हक्क
महाराष्ट्रातील हजारो बांधकाम कामगार स्वतःच्या हक्कांसाठी लढले आणि अखेर त्यांना यश मिळाले. ऑनलाइन अर्ज पोर्टल सुरू झाल्याने आता सरकारच्या योजना पुन्हा सुरू होणार आहेत.
🔴 हेही वाचा 👉 आनंदाची बातमी! मोफत किचन सेट वाटप लवकरच सुरू! पात्र लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपली.