मुंबई: केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, अनेक लाभार्थ्यांना बँकांकडून कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बँक व्यवस्थापनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Maharashtra Deputy CM Eknath Shinde warns banks over delays in government scheme loans. Orders immediate action on PM & CM Rojgar Yojana and farmer loans).
बँकांनी सहकार्य करावे अन्यथा कठोर कारवाई?
शासकीय योजनांबाबत बँकांची उदासीनता पाहता शासकीय व्यवहार थांबवण्याचा विचार का करू नये? असा थेट सवाल शिंदे यांनी केला आहे. युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रधानमंत्री रोजगार योजना आणि मुख्यमंत्री रोजगार योजना महत्त्वाच्या आहेत. तसेच, लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे अजूनही कर्जपोटी कापले जात असल्याच्या तक्रारी येतच आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर मिळाले पाहिजे, यासाठी बँकांनी तत्काळ कार्यवाही करावी, असे आदेशही त्यांनी दिले.
🔴 हेही वाचा 👉 शेतकऱ्यांना २४ फेब्रुवारीला मिळणार पैसे, तुम्हाला मिळणार की नाही? येथे तपासा.
बँक व्यवस्थापनावर दबाव वाढणार?
बँकांचे धोरण लाभार्थीविरोधी राहिल्यास केंद्र व राज्य सरकार कठोर पावले उचलू शकते. त्यामुळे बँकांनी शासकीय योजनांचे पात्र अर्ज तत्काळ मंजूर करावेत, तसेच शासकीय योजनांना सहकार्य करावे अन्यथा पुढील कारवाईस सामोरे जावे लागेल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे. तुमच्या कर्ज अर्जावर बँक अजून निर्णय घेत नाही का? मग हा आदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो!
🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana February Payment Update: 16 लाख महिलांना बसला फटका, मिळणार नाही फेब्रुवारीचा हफ्ता.