Gold Buying Tips Safety Precautions : भारतात सोने खरेदी करण्याची परंपरा खूप जुनी आहे. लग्नसमारंभ असो किंवा गुंतवणूक, सोने खरेदीला नेहमीच मोठे महत्त्व दिले जाते. गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किमतींमध्ये (Gold Price) मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे लोक गुंतवणुकीच्या दृष्टीनेही सोने खरेदी करत आहेत. मात्र, सोने खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली नाही, तर मोठे नुकसान होऊ शकते. (Avoid fraud while buying gold! Check hallmark, verify weight, negotiate making charges, and get a proper bill. Read these essential gold buying tips now).
सोने खरेदी करताना या 5 गोष्टींची घ्या काळजी
- हॉलमार्क असलेले सोनेच खरेदी करा
सोने खरेदी करताना हॉलमार्क (BIS) असलेले सोनेच घ्या. हॉलमार्कमुळे सोन्याची शुद्धता निश्चित केली जाते. 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते, तर 22 कॅरेटमध्ये 91.6% सोन्याचा अंश असतो.
- वजनाची खात्री करा
सोने खरेदी करताना वजन तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही ठिकाणी वजनात फेरफार केला जातो, ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते.
- मेकिंग चार्जवर डिस्काउंट
प्रत्येक ज्वेलर वेगवेगळ्या दराने मेकिंग चार्ज आकारतो. काही दुकानदार 10% ते 20% पर्यंत जास्त शुल्क आकारतात. त्यामुळे मेकिंग चार्जवर डिस्काउंट मागा आणि अंतिम सोन्याचा दर (Gold Rate) निश्चित करा.
- पक्के बिल घ्या
सोने खरेदी केल्यानंतर पक्के बिल घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बिलामध्ये सोने किती कॅरेट आहे, वजन किती आहे, मेकिंग चार्ज आणि कर याची संपूर्ण माहिती असावी. भविष्यात सोने विकायचे असल्यास हे बिल उपयुक्त ठरते.
🔴 हेही वाचा 👉 एका आठवड्यात इतक्या रुपयांनी घसरले सोन्याचे दर, जाणून घ्या आजचा सोन्याचा दर (16 फेब्रुवारी 2025).
- विश्वासार्ह दुकानातूनच खरेदी करा
सोने खरेदी करताना नेहमीच नामांकित आणि विश्वासार्ह ज्वेलर्सकडूनच खरेदी करा. त्यामुळे फसवणुकीचा धोका कमी होतो आणि शुद्ध सोने मिळण्याची खात्री असते.
सोने खरेदी करताना योग्य काळजी घेतली तर फसवणुकीपासून बचाव होऊ शकतो. हॉलमार्क, वजन, मेकिंग चार्ज आणि पक्के बिल यासारख्या गोष्टींवर लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळेच सोने खरेदी करताना हे लक्षात ठेवा आणि सोन्याची खरेदी करा!
🔴 हेही वाचा 👉 अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींचे फेर सर्वेक्षण करणार नाहीत!.