Ladki Bahin Yojana Benefit Exemption Application : लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील करोडो महिलांनी अर्ज केले आहेत. मात्र, आता या योजनेतून निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांवर कारवाई होण्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे अनेक महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही महिलांनी स्वतःहून अर्ज करून मिळालेला लाभ नाकारला आहे. त्यामुळे त्यांना आत्तापर्यंत मिळालेल्या लाभाची रक्कमही परत करावी लागली नाही.
अपात्र असल्यास कुठे करू शकता अर्ज?
लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडण्यास इच्छुक असलेल्या महिला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात “मी अपात्र असल्याने मला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको” असा अर्ज करू शकतात. ज्या महिलांना योजनेचा लाभ नाकारायचा असेल अशा महिला संबंधित कार्यालयात अर्ज करून लाभ नाकारू शकतात.
काही माध्यमांवर लाडकी बहीण योजनेचे निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे, विशेषतः ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. आणि ज्यांच्या कुटुंबात चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वागळून) आहे तरी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांवर कारवाई करून आत्तापर्यंत मिळालेल्या लाभाची दंडासाह वसुली केली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची तपासणी सुरू
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण सात हप्त्यांचे 10,500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता या योजनेची तपासणी सुरू आहे, तपासणी प्रक्रिया पार पडल्यानंतर निकष पूर्ण न करणाऱ्यांवर कारवाई होणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी योग्य माहिती देणे आवश्यक आहे.
🔴 हेही वाचा 👉 फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण.