चारचाकी आहे, तर नाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा हफ्ता, जाणून घ्या नवीन पात्रता निकष Ladki Bahin Yojana Eligibility Four Wheeler Restriction Maharashtra

2 Min Read
Ladki Bahin Yojana Eligibility Four Wheeler Restriction Maharashtra

मुंबई, 5 फेब्रुवारी 2025: Ladki Bahin Yojana Eligibility Four Wheeler Restriction Maharashtra – महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहिन योजना राज्यातील करोडो महिलांसाठी आर्थिक आधार बनली आहे. मात्र, योजनेच्या नियमांनुसार आता, जर महिलेच्या कुटुंबात चारचाकी वाहन असेल, तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. असे सरकारने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेचा उद्देश राज्यातील गरीब महिलांना आर्थिक मदत देणे आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला सध्या दरमहिना 1,500 रुपये दिले जातात.

योजनेच्या पात्रतेचे नियम

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही नियम आहेत:

  1. महाराष्ट्रातील महिलाच पात्र:
    लाडकी बहीण योजना केवळ महाराष्ट्रात राहणाऱ्या महिलांसाठी आहे.
  2. वयाची मर्यादा:
    या योजनेचा लाभ 21 ते 65 वयोगटातील महिलांना मिळू शकतो.
  3. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न:
    महिलेला योजनेचा लाभ मिळण्यासाठी तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे लागते.
  4. कार किंवा चार चाकी वाहन असणे:
    जर महिलेच्या कुटुंबामध्ये कार किंवा अन्य चार चाकी वाहन असेल, तर ती महिला योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
  5. आयकर भरणारा सदस्य:
    जर महिलेच्या कुटुंबात कोणी आयकर भरत असेल, तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

🔴 हेही वाचा 👉 आता लगेच समजणार! लाडक्या बहिणीच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे का? हा मोठा निर्णय लवकरच….

माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) राज्यात महायुती सरकारच्या ऐतिहासिक विजयाचे कारण बनली असल्याचे सांगितले जात आहे. लाडकी बहीण योजना सुरु झाल्यानंतर लगेचच राज्यातील करोडो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आणि अनेक महिलांना अपात्र असतानाही योजनेचा लाभ मिळाला. मात्र आता सरकारने महिलांच्या अर्जांची काटेकोर पडताळणी करून अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्याची मोहीम सुरु केली आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन बॉयफ्रेंड फरार! मला नको रे सोडू….

Share This Article