Ladki Bahin Yojana February Payment Update : माझी लाडकी बहिण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) महाराष्ट्रातील करोडो महिलांसाठी आर्थिक मदतीचा मोठा आधार बनली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. परंतु, फेब्रुवारी महिन्यात (Ladki Bahin Yojana 8th Installment) काही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारकडून पात्रतेचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत, त्यामुळे लाखो महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
काय आहे नवीन अपडेट?
Ladki Bahin Yojana News: राज्य सरकारकडून दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या काही महिलांना फेब्रुवारी महिन्यात 1500 रुपयांचा हफ्ता मिळणार नाही. कारण, सरकारने पात्रतेसाठी ठरवलेले निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना योजनेंतर्गत अपात्र घोषित करण्यात आले आहे.
या महिलांना मिळणार नाही लाभ
सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, खालील निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा लाभ मिळणार नाही –
- ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त आहे.
- ज्या महिलांच्या कुटुंबातील एखादा सदस्य इनकम टॅक्स भरत असेल.
- ज्या महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरी करणारे किंवा पेन्शनधारक आहेत.
- ज्या महिलांना इतर सरकारी किंवा वित्तीय योजनेतून 1500 रुपये आधीच मिळत आहेत.
- ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे.
- चुकीची किंवा बनावट कागदपत्रे जमा करणाऱ्या महिलांना देखील योजनेतून वगळले जाईल.
🔴 हेही वाचा 👉 1 फेब्रुवारी पासून सोन्याच्या किमती वाढणार? जाणून घ्या यामागच नेमक कारण.
16 लाख महिलांना बसला फटका
या योजनेसाठी राज्यभरात 2 कोटी 63 लाख अर्ज आले होते. परंतु, सरकारने तपासणी केल्यानंतर फक्त 2 कोटी 47 लाख महिलांनाच पात्र ठरवले. याचा अर्थ सुमारे 16 लाख महिलांना फेब्रुवारी महिन्यात 1500 रुपयांचा हफ्ता (Ladki Bahin Yojana February Installment) मिळणार नाही.
तुमचे नाव यादीतून काढले गेले आहे का? असे तपासा
जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता मिळाला नाही, तर खालील पद्धतीने तुमच्या अर्जाची स्थिती तपासा –
- योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून स्टेटस तपासा.
- स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद कार्यालयात चौकशी करा.
लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना नियमितपणे आर्थिक मदत मिळत राहील. मात्र, अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे.
महत्त्वाची माहिती:
✅ नवीन निकषांनुसार 16 लाख महिलांना लाभ मिळणार नाही.
✅ योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता वेळेवर मिळेल.
✅ लाभ मिळाला नाही, तर स्थानिक प्रशासन कार्यालयात चौकशी करा.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत? काय करावे….