Ladki Bahin Yojana Latest Update: लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठ अपडेट दिल आहे.
Ladki Bahin Yojana News Marathi: राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होतात. डिसेंबरपर्यंतच्या हप्त्याची रक्कम आधीच महिलांच्या खात्यात जमा झाली आहे, आणि आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
काय म्हणाल्या अदिती तटकरे
मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केल आहे की, जानेवारी महिन्याचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होईल. पुढील 3-4 दिवसांत महिलांना रक्कम मिळण्यास सुरुवात होईल. तटकरे यांनी ही योजना इथून पुढ सुरूच राहील, असा विश्वास दिला आहे. त्याचबरोबर अपात्र महिलांनी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाईल अस अदिती तटकरे म्हणाल्या.
🔥 लेटेस्ट अपडेट 👉 लाडक्या बहिणींसाठी ३,६९० कोटींचा निधी मंजूर, ‘इतक्या’ महिलांना मिळणार जानेवारीच्या हप्त्याचा लाभ.
2100 रुपयांचा लाभ कधीपासून मिळणार?
महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपये देण्याच आश्वासन दिल होत. त्याबाबत बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की, नवीन अर्थसंकल्प तयार झाल्यानंतर या विषयावर निर्णय घेतला जाईल. मात्र, या महिन्यात 1500 रुपयांचाच लाभ देण्यात येणार आहे आणि त्यासाठी 3,690 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
🔥 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट जाणून घ्या.
लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) महिलांसाठी आर्थिक पाठबळ ठरली आहे. या योजनेमुळे महिलांना आत्मनिर्भर बनण्यास मदत झाली असून, ही योजना भविष्यातही सुरू राहणार असल्याच तटकरे यांनी सांगितल.