लाडकी बहीण योजना नवीन अपडेट! आता या महिलांना मिळणार दरमहा फक्त 500 रुपये, शासन निर्णयात स्पष्ट Ladki Bahin Yojana PM Kisan Yojana Namo Shetkari Beneficiary Payment Update

3 Min Read
Ladki Bahin Yojana PM Kisan Yojana Namo Shetkari Beneficiary Payment Update

Ladki Bahin Yojana PM Kisan Yojana Namo Shetkari Beneficiary Payment Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांची तपासणी सुरू आहे. पात्र नसलेल्या महिलांना योजनेतून वगळले जाणार आहे. तसेच, पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) व नमो शेतकरी महासन्मान योजनांच्या (Namo Shetkari Yojana) लाभार्थी महिलांना किती पैसे मिळणार, याबाबतही शासन निर्णयात (GR) स्पष्ट माहिती देण्यात आली आहे.

पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मानच्या लाभार्थींना किती रुपये मिळणार?

Ladki Bahin Yojana Latest News: 28 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये, म्हणजेच वर्षाला 18000 रुपये मिळतात.

  • पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थी महिलांना प्रत्येकी 6000 रुपये मिळतात.
  • त्यामुळे या महिलांना एकूण 12,000 रुपये आधीच मिळत असल्याने, त्यांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा फक्त 500 रुपये मिळतील.
  • इतर पात्र महिलांना पूर्ण 1500 रुपये मिळत राहतील.

🔴 लेटेस्ट अपडेट 👉 सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण! सोन्याचा आजचा भाव १२ फेब्रुवारी २०२५.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची स्क्रूटिनी सुरू!

महिला व बालविकास विभागाने डिसेंबरमध्ये 2 कोटी 46 लाख महिलांना लाभ दिला होता. मात्र, जानेवारीमध्ये ही संख्या 2 कोटी 41 लाखांवर आली आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून सरकारकडून लाभार्थ्यांची चौकशी सुरू आहे. यासाठी परिवहन, कृषी आणि आयकर विभागाची मदत घेतली जात आहे.

अपात्र महिलांची संख्या किती?

माझी लाडकी बहीण योजनेतून (Mazi Ladki Bahin Yojana) 5 लाख महिलांची नावे कमी करण्यात आली आहेत. यामध्ये –

अपात्रतेचे कारण महिला संख्येचा अंदाज
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी 2.3 लाख
वय 65 वर्षांपेक्षा जास्त 1.10 लाख
चारचाकी गाडी, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी किंवा योजनेतून नाव मागे घेणाऱ्या 1.6 लाख
एकूण अपात्र महिलांची संख्या 5 लाख

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजना फसवणूक? यादीतून लाखो महिलांची नावे गायब.

अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत!


महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल आहे की, याआधी मिळालेली रक्कम परत मागितली जाणार नाही. मात्र, जे निकष पूर्ण करणार नाहीत, त्यांचा लाभ थांबवला जाईल.

✔️ लाभार्थी महिलांची यादी तपासणीसाठी विविध विभागांचा सहभाग.
✔️ 5 लाख अपात्र महिलांना योजनेतून वगळले गेले.
✔️ पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मानच्या लाभार्थी महिलांना दरमहा फक्त 500 रुपये मिळणार.
✔️ अपात्र महिलांकडून पूर्वी दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पंचवीस लाख ‘लखपती दीदी’ बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Share This Article