Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेबाबत SBI चा सरकारला धोक्याचा इशारा! महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर मोठा परिणाम होणार?

2 Min Read
Ladki Bahin Yojana SBI Warning Maharashtra Economy

Ladki Bahin Yojana News: महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहिण योजना सध्या चर्चेत आहे. महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा करणाऱ्या या योजनेबाबत देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने धोक्याचा इशारा दिला आहे. लाडकी बहिण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण येण्याची शक्यता असून, भविष्यातील अर्थसंकल्पावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.  

लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर ताण?

Ladki Bahin Yojana SBI Warning Maharashtra Economy: SBI च्या अहवालानुसार, या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारला दरवर्षी सुमारे ₹45,000 कोटींचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. हा खर्च राज्याच्या एकूण महसुलाच्या जवळपास १५% आहे, त्यामुळे इतर महत्त्वाच्या विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.  

इतर राज्यांतील योजनांची तुलना

महाराष्ट्राच्या ‘माझी लाडकी बहीण योजने’प्रमाणे (Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra) इतर राज्यांमध्येही महिला सक्षमीकरणासाठी अशा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये –  

  • कर्नाटकाची गृहलक्ष्मी योजना – ₹28,608 कोटी वार्षिक खर्च (राज्य महसुलाच्या 11%)  
  • पश्चिम बंगालची लक्ष्मी भंडार योजना – ₹14,400 कोटी वार्षिक खर्च (राज्य महसुलाच्या 6%)  
  • एकूण 8 राज्यांतील या योजनांसाठी ₹1.5 लाख कोटींहून अधिक खर्च 

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजना अपात्र महिलांची यादी जाहीर – त्वरित तपासा आपले नाव.

SBI चा सरकारला धोक्याचा इशारा

SBI च्या अहवालानुसार, निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर अशा थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना जाहीर केल्यास भविष्यात केंद्र सरकारवरही मोठा आर्थिक ताण येऊ शकतो. यामुळे अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे.  

सरकार २१०० रुपयांच आश्वासन कस पूर्ण करणार?

सध्या महाराष्ट्र सरकार महिलांना ₹1500 अनुदान देत आहे. मात्र, सरकारने २१०० रुपयांपर्यंत वाढीचे आश्वासन दिले आहे. विरोधकांनीही यावर प्रश्न उपस्थित केले असून, हा वाढीव खर्च सरकार कुठल्या पैशातून करणार? हा मोठा मुद्दा ठरत आहे.

🔴 हेही वाचा 👉 फेब्रुवारीतच महिलांना मिळणार १५०० ऐवजी २१०० रुपये? जाणून घ्या सविस्तर.

लोकप्रिय योजनांवर मर्यादा येणार?

SBI च्या या अहवालानंतर भविष्यात अशा योजना (Government Scheme) जाहीर करण्यावर काही प्रमाणात बंधने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, यावर सरकारची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

Share This Article