Ladki Bahin Yojana Supreme Court Freebies Decision : निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांकडून जाहीर केल्या जाणाऱ्या मोफत योजनांवर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) बंद होणार का? अशी चर्चा रंगली आहे. (The Supreme Court questions free schemes before elections. Will Ladki Bahin Yojana stop? Read about the court’s stance on freebies and its impact on welfare programs).
सुप्रीम कोर्टाने काय म्हटले?
Supreme Court on Freebies : शहरी बेघरांच्या निवाऱ्यासंबंधी याचिकेवर सुनावणी करताना, न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने मोफत योजनांबाबत महत्त्वाची टिप्पणी केली. त्यांनी स्पष्ट केले की, “लोकांना मोफत रेशन आणि सरकारी योजनांमधून पैसे मिळत असल्याने ते काम करण्यास टाळाटाळ करतात.” त्याऐवजी या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणल्यास देशाच्या विकासात त्यांचा सहभाग वाढेल.
🔴 हेही वाचा 👉 सोने खरेदी करताना या 5 गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा होऊ शकते तुमची फसवणुक.
लाडकी बहीण योजनेवर परिणाम होणार का?
Ladki Bahin Yojana Supreme Court News : सुप्रीम कोर्टाच्या या भूमिकेमुळे अनेक मोफत योजनांवर परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती, ज्या अंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. परंतु जर मोफत योजना रोखण्याचा आदेश आला, तर या योजनेवरही संकट येऊ शकते.
राजकीय पक्षांना धक्का?
सुप्रीम कोर्टाच्या या भूमिकेमुळे राजकीय पक्षांना मोठा धक्का बसू शकतो. निवडणुकीदरम्यान अनेक पक्ष मोफत सुविधा देण्याचे आश्वासन देतात. यापूर्वीही सुप्रीम कोर्टाने अशा घोषणांवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत सरकार आणि निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
🔴 हेही वाचा 👉 Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण! पुढे काय वाढून ठेवलय?.
पुढील सुनावणी कधी?
Ladki Bahin Yojana Supreme Court Freebies Decision : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून पुढील सहा आठवड्यांत या प्रकरणावर स्पष्टता मागितली आहे. त्यानंतर यावर पुढील सुनावणी होणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींचे फेर सर्वेक्षण करणार नाहीत!.