Ladki Bahin Yojana : सर्वोच्च न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून ‘लाडकी बहिण’ योजना गुंडाळण्याचा प्रयत्न – उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

2 Min Read
Ladki Bahin Yojana Uddhav Thackeray Attack Mahayuti

(Ladki Bahin Yojana Uddhav Thackeray Attack Mahayuti) मुंबई, 14 फेब्रुवारी 2025 – महाराष्ट्रातील ‘लाडकी बहिण’ योजना बंद होण्याच्या चर्चांना आता राजकीय वळण मिळाल आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर होणाऱ्या मोफत योजनांवर टीका केली होती. यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

सरकारच्या निर्णयावर ठाकरे संतप्त

उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका करताना म्हटले की, “महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून ‘लाडकी बहिण’ योजना गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे.” त्यांनी सामना दैनिकाच्या अग्रलेखातून सरकारवर हल्लाबोल केला.

महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता

उद्धव ठाकरे यांच्या मते, महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर प्रचंड कर्जाचा बोजा आहे. देशावर 205 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे, तर महाराष्ट्रावर तब्बल साडेसहा लाख कोटींचे कर्ज आहे. भारतीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांनीही महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

मोफत योजनांवरून सरकारवर टीका

न्या. भूषण गवई यांनी निवडणुकीपूर्वी घोषित मोफत योजनांमुळे लोक काम करण्यास इच्छुक नसल्याचे नमूद केले. ठाकरे यांनी हे विधान उचलून धरत महायुतीवर टीका केली. “फुकट पाणी, वीज, बँकेत पैसे जमा करणे आणि मोफत धान्य देणे म्हणजे सरकारची कर्ज काढून दिवाळी आहे,” असे त्यांनी म्हटले.

🔴 हेही वाचा 👉 RBI Update : भारतीय नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो हटणार? RBI च स्पष्टीकरण.

‘राम’ नाही, रोजगार द्या – उद्धव ठाकरे

ठाकरे यांनी सरकारला टोला लगावत म्हटले, “लोकांना घर द्या, रोजगार द्या. फक्त ‘राम’ दिल्याने काही होणार नाही.” त्यांनी महायुती सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, “मजुरांना योग्य वेतन द्या, शेतकऱ्यांना हमीभाव द्या, म्हणजे मोफत योजनांची गरजच उरणार नाही.”

‘लाडकी बहिण’ योजना बंद होणार?

महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली ‘माझी लाडकी बहिण’ योजना (Majhi Ladki Bahin Yojana) बंद होणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आले आहे. ठाकरे गटाने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. आता या विषयावर महायुती सरकार काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

🔥 हेही वाचा 👉 Rajmata Jijau Free Cycle Scheme Maharashtra: या योजनेतून शालेय विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सायकल.

Share This Article