Ladki Bahin Yojana Viral News : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तरुणीच्या पैशांवर कथित बॉयफ्रेंडने डल्ला मारला आणि गायब झाला. सोशल मीडियावरील एका व्हायरल पोस्टनुसार, तरुणीने आपले पैसे बॉयफ्रेंडला दिले होते. मात्र, त्याने पैसे घेतले आणि तिला सोशल मीडियावर व फोनवरून ब्लॉक केले. (Ladki Bahin Yojana money fraud! A girl claims her boyfriend took her scheme money and disappeared. Social media post goes viral).
सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
संबंधित तरुणीने आपल्या व्यथा मांडण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबली. तिने एका नोटेवर संदेश लिहून सोशल मीडियावर पोस्ट केला. त्या नोटेवर तिने लिहिले, “गणेश, ब्लॉकमधून काढ मला. मी माझे लाडकी बहीणीचे पैसे तुला मोबाईलसाठी दिले. तूच आता अस वागणार का माझ्याशी? मला नको रे सोडू, मला एक तरी कॉल कर. वाट बघते. तुझीच सोनाली.”
संबंधित पोस्ट अवघडंय भाऊ (avaghaday_bhau) नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे, मात्र हा प्रकार खरोखर घडला आहे का, की केवळ सोशल मीडियावर पसरलेली अफवा आहे याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी ही आहे सर्वात ताजी अपडेट!.
![Ladki Bahin Yojana Viral News](https://sarkarinewsmarathi.in/wp-content/uploads/2025/02/1000014090.jpg)