Mahila Samman Saving Certificate Last Date 2025 : अर्थसंकल्प 2025 (Budget 2025) मध्ये महिलांसाठी कोणतीही नवीन मोठी सरकारी योजना (Sarkari Yojana) जाहीर करण्यात आलेली नाही. तर उलट महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजना बंद होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात या योजनेची मुदत वाढवण्याबाबत कोणताही उल्लेख केला नाही. त्यामुळे 31 मार्च 2025 हा या योजनेत गुंतवणुकीसाठीचा अंतिम दिवस ठरू शकतो.
का बंद होणार MSSC योजना?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना 2023 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही योजना महिलांसाठी असणारी अल्पमुदतीची बचत योजना म्हणून ओळखली जाते. मात्र, आता सरकारकडून या योजनेची मुदत वाढवण्यात आलेली नाही. त्यामुळे 1 एप्रिल 2025 पासून या योजनेत नवीन गुंतवणूक करता येणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण बंद! अंगणवाडी सेविकांचा सरकारला इशारा, मागण्या पूर्ण न झाल्यास….
योजनेचे फायदे आणि व्याजदर
- 7.5% वार्षिक व्याजदर
- 2 वर्षांत परिपक्वता
- किमान गुंतवणूक – ₹1000
- कमाल गुंतवणूक – ₹2 लाख
- कोणतीही महिला योजनेसाठी खाते उघडू शकते
महिलांना गुंतवणुकीसाठी शेवटची संधी!
जर तुम्हाला महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा (Mahila Samman Saving Certificate Yojana) लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे फक्त 31 मार्च 2025 पर्यंत वेळ आहे. त्यानंतर ही योजना बंद होणार असल्याने नवीन गुंतवणूक करता येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या!
🔴 हेही वाचा 👉 मोठी बातमी! पुण्यातील 75 हजारांहून अधिक लाडक्या बहिणींकडे चारचाकी! प्रशासनाने घेतला मोठा निर्णय.