Majhi Ladki Bahin Yojana Payment Status Check Online : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदत देणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र, काही महिलांना त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, हे अजून माहीतच नाही. अशा परिस्थितीत महिलांनी वेळ न घालवता, खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासणे गरजेचे आहे. खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासण्यासाठी खालील 4 सोप्या पद्धतींचा अवलंब करा.
महिलांसाठी महत्त्वाची सूचना:
लाडकी बहिण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) पात्र महिलांनी आधार नंबर बँक खात्याशी लिंक केलेला असावा. तसेच, इतर कागदपत्रांची पूर्तता केली असल्यास योजनेचा लाभ मिळेल. तुम्ही पात्र असूनही जर तुमच्या खात्यात अद्याप पैसे आले नसतील, तर लवकरात लवकर शासकीय यंत्रणेशी संपर्क साधा.
🔴 हेही वाचा 👉 आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची संधी! UIDAI ने वाढवली अंतिम तारीख, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.
पैसे आले की नाही हे तपासण्याच्या 4 एकदम सोप्या पद्धती | Ladki Bahin Yojana Check Payment Status
- बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करा
- आपल्या बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर कॉल करून खात्यात पैसे जमा झाले आहेत का, हे सहजपणे तपासू शकता.
- ऑनलाईन बँकिंग किंवा बँक अॅपचा वापर करा
- बँकेचे अधिकृत अॅप किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून तुमचे बँक स्टेटमेंट डाउनलोड करा आणि खात्याचा तपशील तपासा.
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेले एसएमएस तपासा
- पैसे जमा झाल्यावर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस येतो. तो एसएमएस पाहून रक्कम जमा झाल्याची खात्री करा.
- प्रत्यक्ष बँकेत जाऊन
- जर तुम्ही ऑनलाइन बँक बॅलन्स चेक करू शकत नसाल, तर तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन खाते तपशील विचारून खात्यात पैसे आले की नाही हे तपासा.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या महिलांना दरमहा ₹1500 ची रक्कम दिली जात आहे. मार्च/एप्रिल 2025 पासून वाढीव हप्ता मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात पैसे आलेत का, हे तपासण्यासाठी या 4 पद्धती अत्यंत सोप्या आणि उपयुक्त आहेत.
🔴 हेही वाचा 👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल, अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.