Majhi Ladki Bahin Yojana Registration 2025 Promotion Campaign : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) प्रसिद्धीसाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पात्र असूनही माहितीअभावी अद्याप लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज न केलेल्या तसेच ग्रामीण भागातील महिलांपर्यंत योजना पोहोचावी म्हणून सरकार सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रचार करणार आहे. यासाठी नवीन जीआर जारी करण्यात आला आहे.
योजनेच्या प्रसिद्धीसाठी मोठी रणनीती
महायुती सरकारने मागील वर्षी लाडकी बहिण योजना सुरू केली होती. राज्यभरातून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, अजूनही अनेक गरजू महिलांना योजनेबाबत माहिती नाही. त्यामुळे सरकारने लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी योजनेचे नियम व अटी स्पष्ट करणाऱ्या जाहिराती करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियावर भर
राज्य सरकारने जारी केलेल्या जीआरनुसार, प्रचारासाठी ३ कोटी रुपये खर्च केले जातील. यामध्ये –
- सोशल मीडिया जाहिरातींसाठी – १.५ कोटी रुपये
- डिजिटल मीडिया प्रचारासाठी – १.५ कोटी रुपये
ही जाहिरात मोहीम महिला व बालविकास विभागाच्या समन्वयाने राबविली जाणार आहे.
कोणत्या महिलांना होईल फायदा?
योजनेच्या अटी आणि पात्रता स्पष्ट करण्यासाठी सोशल मीडियाद्वारे माहिती पोहोचवली जाणार आहे. यामुळे अद्याप लाभ न मिळालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
🔴 सरकारी नोकरी 👉 10वी, 12वी पासांसाठी सर्वात मोठी भरती, 1.10 लाख रुपये पर्यंत पगार! अर्ज सुरू.
सरकारचा उद्देश?
राज्यातील सर्व पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी सरकारने ही मोहीम हाती घेतली आहे. डिजिटल प्रचारामुळे शहरांसह ग्रामीण भागातील महिलांपर्यंत माझी लाडकी बहीण योजनेची (Mazi Ladki Bahin Yojana) माहिती जलद पोहोचेल.
राज्यातील प्रत्येक पात्र महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकार लाडकी बहिण योजनेच्या प्रचारावर भर देत आहे. जर तुम्ही अजूनही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर आता लवकरच लाडकी बहीण योजनेसाठीची नवीन अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. तत्पूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि अर्ज प्रक्रिया (Ladki Bahin Yojana Registration 2025) सुरु होताच योजनेसाठी अर्ज करा.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहिन योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार? फक्त या महिलांच्या खात्यातच येणार पैसे.