Mazi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे पैसे बंद करण्यावरून जयंत पाटील आक्रमक, सरकारला दिला स्पष्ट इशारा

2 Min Read
Mazi Ladki Bahin Yojana Jayant Patil Warning

Mazi Ladki Bahin Yojana Jayant Patil Warning : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत (Majhi Ladki Bahin Yojana) मोठे बदल होत आहेत. राज्य सरकारने या योजनेतील अर्जांची पडताळणी सुरू केली आहे. त्यानुसार आतापर्यंत ५ लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. विरोधकांनी यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. (Jayant Patil warns Mahayuti govt over Mazi Ladki Bahin Yojana beneficiaries losing aid. Govt scrutiny disqualifies 5 lakh women).

लाडक्या बहिणींसाठी तालुका स्तरावर लढा – जयंत पाटील

Ladki Bahin Yojana Latest Update In Marathi: जयंत पाटील यांनी सांगितले की, “लाडक्या बहिणींच्या हक्काचे पैसे कसे बंद करतात ते पाहूच. आम्ही प्रत्येक तालुक्यात या योजनेसाठी लढा उभारणार.” त्यांनी सरकारला विचारले की, “महिलांनी तुम्हाला मते दिली, मग त्यांचा विश्वासघात का करताय?”

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजना यादीतून लाखो महिलांची नावे गायब.

राज्य सरकार आर्थिक अडचणीत?

लाडकी बहीण योजनेमुळे (CM Ladki Bahin Yojana) राज्य सरकारवर मोठा आर्थिक ताण आला आहे. त्यामुळेच लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी तपासणी केली जात आहे. विरोधकांचा दावा आहे की, पुढील काही महिन्यांत लाभार्थ्यांची संख्या २५ लाखांच्या आत आणली जाईल.

इतर योजनांचे अनुदान

Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi: लाडकी बहीण योजनेचा परिणाम इतर योजनांवरही झाला आहे. संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana), श्रावणबाळ योजना (Shravan Bal Yojana), शेतकरी अनुदान योजना (Shetkari Anudan Yojana 2025) आणि रोजगार हमी योजनेतील (Rojgar Hami Yojana Maharashtra) निधी रखडला आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजना नवीन अपडेट! आता या महिलांना मिळणार दरमहा फक्त 500 रुपये, शासन निर्णयात स्पष्ट.

महायुती सरकारची पुढील रणनीती काय?

महायुती सरकार (Mahayuti Sarkar) या योजनेबाबत कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे. विरोधक मात्र महिलांसाठी लढा देण्यास तयार असल्याचे स्पष्ट संकेत देत आहेत.

🔴 हेही वाचा 👉 पिएम आवास योजनेत मोठा बदल! आता ‘या’ कुटुंबांनाही मिळणार लाभ.

Share This Article