NPS Yojana 2025: सरकारी योजनेतून आता तुम्ही महिन्याला १ लाख रुपये पेन्शन मिळवू शकता, आणि त्यासाठी सरकारी नोकरी असण्याची गरज नाही. हा लाभ तुम्ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजने (NPS) अंतर्गत घेऊ शकता.
राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) काय आहे?
NPS Yojana In Marathi: NPS योजना सरकारच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेली आहे, ज्यात सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचारी गुंतवणूक करू शकतात. ही योजना शेअर बाजाराशी संबंधित आहे, त्यामुळे थोडी जोखीम आहे. मात्र, दीर्घकालीन गुंतवणूक असल्याने त्यात धोका कमी होतो.
महिन्याला १ लाख रुपये पेन्शन मिळवण्याचे गणित
जर तुम्हाला NPS योजनेतून महिन्याला १ लाख रुपये पेन्शन हवं असेल, तर तुम्हाला किमान पुढील २० वर्षांमध्ये दरमहा २० हजार रुपये गुंतवावे लागतील. तसेच, प्रत्येक वर्षी गुंतवणूक १० टक्क्यांनी वाढवावी लागेल. यामुळे २० वर्षांनंतर तुमची एकूण गुंतवणूक सुमारे ३ कोटी २३ लाख रुपये होईल. यामधून तुम्हाला ६०% म्हणजेच १.८५ कोटी रुपये एकरकमी मिळतील आणि ४०% रकमेपासून तुम्हाला १ लाख रुपये महिन्याला पेन्शन मिळेल.
NPS योजनेच्या अटी
- NPS खाते कोणत्याही सरकारी किंवा राष्ट्रीयकृत बँकेत उघडता येते.
- निवृत्तीनंतर ६०% रक्कम एकरकमी काढता येते.
- ४०% रकमेपासून पेन्शन सुरू केली जाते.
- ५ लाख किंवा त्यापेक्षा कमी रकमेवर करमुक्त काढणीची सुविधा.
NPS योजनेच्या मदतीने तुम्ही चांगली आर्थिक सुरक्षा मिळवू शकता, आणि निवृत्तीनंतर आरामदायक जीवन जगू शकता. सरकारी नोकरी नसलेल्या व्यक्तींसाठी ही योजना एक सुवर्णसंधी आहे.
🔴 हेही वाचा 👉 लेकीच्या लग्नाची चिंता सोडा! कन्यादान योजना आहे मदतीला.