PM Awas Yojana: पिएम आवास योजनेत मोठा बदल! आता ‘या’ कुटुंबांनाही मिळणार लाभ

3 Min Read
PM Awas Yojana 15000 Income Bike Owners Eligibility

नवी दिल्ली, १२ फेब्रुवारी २०२५: PM Awas Yojana Maharashtra – प्रधानमंत्री आवास योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या कुटुंबांचे मासिक उत्पन्न १५,००० रुपये आहे आणि ज्यांच्याकडे बाइक आहे, त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी अशा कुटुंबांना या योजनेतून वगळण्यात आले होते.

कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्यांना प्राधान्य

देशभरात कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर केली जाईल आणि नवीन आर्थिक वर्षात पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठी (Gharkul Yojana Maharashtra) मदत दिली जाईल.

नवीन गाइडलाइनमध्ये मोठा बदल

PM Awas Yojana 15000 Income Bike Owners Eligibility : ग्राम विकास विभागाने याआधीच्या गाइडलाइनमध्ये बदल करून आता १५,००० रुपये मासिक उत्पन्न असलेले आणि बाइक धारक कुटुंबही योजनेस पात्र ठरवली आहेत. याआधी अशा कुटुंबांना योजनेतून वगळण्यात आले होते. आता सर्वेक्षणाद्वारे अशा लाभार्थ्यांना ओळखले जाणार आहे आणि त्यांच्या नावाची नोंद ‘PM Awas Yojana List Maharashtra 2025’ मध्ये केली जाणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पंचवीस लाख ‘लखपती दीदी’ बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

सर्वेक्षणाची प्रक्रिया कशी होणार?

  • गावस्तरावर घराघरात पाहणी: पंचायत स्तरावर घराघरात जाऊन तपासणी केली जात आहे.
  • आवास सहाय्यक आणि स्थानिक प्रशासनाचा सहभाग: यादीत अपात्र लाभार्थ्यांचा समावेश होऊ नये यासाठी योग्य काळजी घेतली जात आहे.
  • Awas Plus App द्वारे अंतिम यादी तयार: पात्र कुटुंबांची माहिती डिजिटल पद्धतीने संकलित केली जाईल.

या कुटुंबांना लाभ मिळणार नाही

  • ज्या कुटुंबांकडे ५०,००० रुपये किंवा त्याहून अधिक केसीसी कर्ज आहे.
  • ज्या कुटुंबांकडे तीन चाकी वाहन आहे.
  • ज्या कुटुंबांतील एखादा सदस्य आयकर किंवा व्यवसाय कर भरतो.

घर बांधण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध

नवीन गाइडलाइननुसार, ज्या कुटुंबांना आजवर (Gharkul Yojana 2025 Maharashtra) योजनेचा लाभ मिळालेला नाही आणि त्यांना स्वतःच्या पसंतीच घर बांधायच आहे, त्यांना विशेष पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे आता अधिकाधिक गरीब कुटुंबांना घरे मिळू शकतील.

सरकारचा मोठा निर्णय

सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो गरीब कुटुंबांना घरे मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. विशेषतः ज्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न १५,००० रुपये आहे आणि जे पूर्वी अपात्र ठरले होते, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण! सोन्याचा आजचा भाव १२ फेब्रुवारी २०२५.

Share This Article