PM Awas Yojana 2025: पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या! ऑनलाइन व ऑफलाइन

3 Min Read
PM Awas Yojana 2025 Eligibility Apply Online

PM Awas Yojana 2025 Eligibility Apply Online : प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना घर मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. २५ जून २०१५ रोजी सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत तीन कोटींहून अधिक घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर आणखी ३ कोटी घर बांधण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.

पिएम आवास योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करता येतो. अर्जाची प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती जाणून घेऊयात…

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्रता

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने पुढील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे –

✔ अर्जदार भारतीय नागरिक असावा.
✔ कुटुंबातील कोणाच्याही नावावर घर नसावे.
✔ अर्जदाराने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
✔ सरकारी कर्मचारी आणि करदाते यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
✔ अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
✔ ग्रामीण भागासाठी उत्पन्न मर्यादा – वार्षिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा कमी असावे.
✔ शहरी भागासाठी उत्पन्न मर्यादा – वार्षिक उत्पन्न १८ लाखांपेक्षा कमी असावे.
✔ EWS (गरीब) गटातील नागरिकांसाठी उत्पन्न मर्यादा ३ लाख रुपयांपेक्षा कमी असावी.

🔴 हेही वाचा 👉 कमीत कमी गुंतवणूक करून मिळवा पेन्शन, भारत सरकारची सामाजिक सुरक्षा योजना.

पंतप्रधान आवास योजनेचे प्रकार

ही योजना दोन गटांत विभागली आहे –
1️⃣ पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PMAY-G) – ग्रामीण भागातील नागरिकांसाठी
2️⃣ पंतप्रधान आवास योजना शहरी (PMAY-U) – शहरी भागातील नागरिकांसाठी

पिएम आवास योजना अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

✅ आधार कार्ड
✅ पॅन कार्ड
✅ बीपीएल कार्ड (गरीब घटकांसाठी)
✅ बँक पासबुक
✅ जातीचा दाखला
✅ उत्पन्नाचा दाखला
✅ रहिवासी प्रमाणपत्र
✅ मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
✅ पासपोर्ट साइज फोटो

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा?

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया:

📌 जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर जाऊन अर्ज भरावा लागेल.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:

🖥 स्टेप 1: अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
🔗 स्टेप 2: होमपेजवर दिलेल्या ‘Apply Online’ लिंकवर क्लिक करा.
📋 स्टेप 3: फॉर्ममध्ये आवश्यक माहिती अचूक भरा.
📎 स्टेप 4: आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
✅ स्टेप 5: सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट कर.

अर्ज करण्याची अंतिम तारीख:

🚨 अद्याप अर्ज करण्याची अधिकृत अंतिम तारीख जाहीर झालेली नाही, मात्र इच्छुक नागरिकांनी लवकरात लवकर अर्ज करावा!

🔴 नोकरी 👉 १०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात नोकरीची संधी, मासिक वेतन ₹१९,९००/- त्वरित अर्ज करा.

Share This Article