शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आता Farmer ID असल्याशिवाय मिळणार नाही PM किसान योजनेचा लाभ

2 Min Read
PM Kisan Farmer ID Mandatory New Rule Maharashtra

PM Kisan Farmer ID Mandatory New Rule Maharashtra : PM किसान योजनेच्या 19व्या हफ्त्याची तारीख जवळ आली असताना अशातच पिएम किसान योजनेसंबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.

मुंबई: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नवा नियम लागू केला आहे. आता PM किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) अनिवार्य असेल. तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड लिंक करणेही आवश्यक करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या अ‍ॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची ओळख नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, हा क्रमांक शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या सीएससी केंद्रांवर उपलब्ध होतील.

नवीन नियमाची अंमलबजावणी कधीपासून?

पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, या हप्त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक नसणार. 20 व्या हप्त्यापासून हा नियम लागू होईल. यासोबतच नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कुटुंबातील पती-पत्नी आणि 18 वर्षांखालील सदस्यांचे आधार कार्ड नोंदणी करणे बंधनकारक असेल. नियमांचे पालन न केल्यास शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

🔴 हेही वाचा 👉 24 फेब्रुवारीला जमा होणार PM किसान योजनेचा 19वा हप्ता, तुमच्या खात्यात जमा होणार का?.

ई-केवायसी व आधार लिंकिंगची स्थिती

पीएम किसान योजनेत सध्या 96 लाख 67 हजार शेतकरी लाभार्थी आहेत. यापैकी 95 लाख 16 हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केले आहे, तर 1 लाख 89 हजार शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही. बँक खात्याशी आधार लिंकिंगच्या स्थितीबाबत बोलायचे झाले तर, 94 लाख 55 हजार शेतकऱ्यांनी त्यांचे खाते आधारशी जोडले आहे, मात्र 1 लाख 98 हजार शेतकऱ्यांची लिंकिंग प्रक्रिया अपूर्ण आहे.

शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक कसा मिळवावा?

शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक मिळवण्यासाठी (Farmer ID) जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी. यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अनेक गावांमध्ये जागरूकता शिबिरे आणि नोंदणी मोहिमाही सुरू केली आहे.

🔴 हेही वाचा 👉 Farmer ID Registration Online Apply: लगेच मिळेल फार्मर आयडी, अशी करा नोंदणी.

शेतकरी ओळख क्रमांकामुळे (Farmer ID) लाभार्थ्यांच्या माहितीची अचूकता सुनिश्चित होईल, तसेच शेतकऱ्यांना पीएम किसान सह इतर शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होईल.

Share This Article