Shetkari Yojana New Initiatives Farming Schemes Maharashtra : राज्यातील कृषी उत्पादन सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कृषी विभागाच्या योजनांमध्ये (Shetkari Yojana 2025) काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘विकेल ते पिकेल’ या फॉर्म्युलावर आधारित नवीन योजना करण्यात येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. यासोबतच, कालबाह्य झालेल्या आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नसलेल्या योजनांचे पुनरावलोकन करून नव्याने सुधारित प्रस्ताव तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.
वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सुधारणांसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने कृषी विभागाच्या योजना (Farmers Schemes In Maharashtra) जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा विचार केला आहे. यामध्ये योग्य आणि गुणवत्तापूर्ण लाभार्थ्यांची निवड, आणि त्यांना त्यांची गरज असलेली मदत देण्याचा आग्रह करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढविण्यासाठी भांडवली गुंतवणुकीवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे.
विकेल ते पिकेल (Vikel Te Pikel Yojana) पीक पद्धतीचा अवलंब करण्याचा विचार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना जास्त नफा मिळवता येईल. याशिवाय, सरकार कृषी क्षेत्रातील दुय्यम योजना आणि त्यांच्या नव्या बदलांविषयी सरकारला शिफारशी करणार आहे. शेतीविकास आणि उत्पन्न वाढीवर जोर दिला जाणार असून, कृषी विभागाच्या योजनांचे एकत्रीकरण केले जाईल.
आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या शेतीविकासासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील. त्याचबरोबर, पिक विमा, एनडीआरफ, एसडीआरएफ यांसारख्या योजनांच्या सुधारित प्रस्तावांवर विचार केला जाईल.
कृषी क्षेत्रातील सुधारणा आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हे बदल फार महत्त्वाचे ठरणार आहेत.
🔴 हेही वाचा 👉 मोठी बातमी! ३० लाख महिला अपात्र? अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.