Women Free Scooty Scheme : या योजनेतून मिळते महिलांना मोफत स्कूटी? जाणून घ्या सविस्तर माहिती

2 Min Read
Women Free Scooty Scheme Fake Alert

Free Scooty Yojana 2025 Maharashtra Online Registration: सरकारद्वारे महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जातात. पण सध्या चर्चेत असलेली ‘मोफत स्कूटी योजना’ (Free Scooty Yojana For Women) महिलांसाठी एक सुवर्णसंधी असल्याचा दावा केला जात आहे. या योजनेची माहिती अनेक वेबसाईट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर वेगाने पसरत आहे. मात्र, ही योजना खरोखरच अस्तित्वात आहे का, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

मोफत स्कूटी योजना – काय आहे दावा?

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, भारत सरकार महिला सक्षमीकरणासाठी आणि शिक्षण प्रोत्साहनासाठी ‘मोफत स्कूटी योजना’ (Women Free Scooty Scheme In Maharashtra) राबवत आहे. या योजनेनुसार, पदवीधर मुलींना मोफत स्कूटी देण्यात येते. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होईल, असा या योजनेचा उद्देश सांगितला जात आहे.

सरकारने दिलेले स्पष्टीकरण

सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर आणि पत्रकांमध्ये ‘मोफत स्कूटी योजना’ यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे ही योजना पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट होते. अशी कोणतीही योजना सध्या भारत सरकारकडून राबवली जात नाही.

केली जातेय महिलांकडून वैयक्तिक माहिती गोळा

या बनावट योजनेचा प्रचार करून अनेक सायबर गुन्हेगार महिलांकडून वैयक्तिक माहिती गोळा करत आहेत. यासाठी महिलांना अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, बँक खाते क्रमांक आणि इतर गोपनीय माहिती मागवली जाते. ही माहिती फसवणूक करणाऱ्या लोकांकडे पोहोचल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते.

योजनेच्या नावाखाली फसवणुकीपासून वाचा

  1. अधिकृत स्त्रोत तपासा: कोणतीही योजना खरी आहे का हे जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटवरून माहिती मिळवा.
  2. अनधिकृत लिंक टाळा: सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या लिंक्सवर क्लिक करू नका.
  3. फसवणूक ओळखा: अर्ज प्रक्रिया सुलभ असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही योजनेवर लगेच विश्वास ठेवू नका.

‘मोफत स्कूटी योजना 2025’ (Free Scooty Yojana 2025) ही एक बनावट योजना असून महिलांनी अशा फसवणुकीपासून सावध राहणे गरजेचे आहे. महिलांनी कोणतीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती अनोळखी प्लॅटफॉर्मवर शेअर करू नये. कोणत्याही योजनेबद्दल माहिती मिळवण्यासाठी नेहमीच अधिकृत सरकारी वेबसाईट वर विश्वास ठेवा.

“सावध राहूया, फसवणुकीपासून वाचूया!”

🔴 हेही वाचा 👉 आता सर्व सरकारी योजना एकाच अ‍ॅपमध्ये, नागरिकांसाठी सरकारची नवीन सुविधा.

Share This Article