Ladki Bahin Yojana Drip Irrigation Subsidy Stopped: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याची माहिती समोर आली आहे. मराठवाड्यातील ठिबक सिंचन अनुदान गेल्या काही महिन्यांपासून थांबले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. (Maharashtra’s Ladki Bahin Yojana impacts farmers as ₹5.6 crore drip irrigation subsidy is delayed. Farmers question fund allocation. Read the latest update).
शेतकऱ्यांचे 5 कोटी 60 लाख रुपयांचे अनुदान थांबले
Ladki Bahin Yojana : राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Mazi Ladki Bahin Yojana) दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात सरकारी निधी खर्च केला जात आहे. त्यामुळे इतर योजनांसाठी निधी अपुरा पडत असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन अनुदान थांबले असून 5 कोटी 60 लाख रुपयांचे अनुदान रखडले आहे.
शेतकऱ्यांचा आक्रोश – “आमच्यावर अन्याय का?”
Ladki Bahin Yojana : मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने ठिबक सिंचन बसवले आहे. मात्र, त्यांना सरकारकडून अपेक्षित अनुदान मिळालेले नाही. अनुदानासाठी अर्ज केले असतानाही बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. शेतकरीवर्गातून आता प्रश्न उपस्थित केला जात आहे – “लाडक्या बहीणींना पैसे मिळत आहेत, पण आमचे अनुदान का थांबवले?”
🔴 हेही वाचा 👉 आधार कार्डवर कर्ज! सरकारची नवीन योजना, कोणत्याही गॅरंटीविना, आता छोटे व्यावसायिक होणार आत्मनिर्भर.
विकास कामांवर परिणाम?
Ladki Bahin Yojana Side Effects : लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असल्याने इतर विकास कामांना फटका बसल्याचे बोलले जात आहे. अनेक जनहिताच्या योजना निधीअभावी रखडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या अनुदानासोबतच अनेक महत्त्वाच्या सरकारी योजनांचा वेग मंदावल्याचे चित्र आहे.
5 लाख महिलांना अपात्र ठरवले
महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा तपासणी सुरू केली आहे. आत्तापर्यंत योजनेतील निकषात न बसणाऱ्या 5 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! येत्या 48 तासात जमा होणार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता?.
सरकारकडून निर्णयाची प्रतीक्षा
शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन अनुदान पुन्हा सुरू होणार का? लाडकी बहीण योजनेच्या निधीमुळे इतर योजना थांबणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकार या संदर्भात काय निर्णय घेते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 मोठ्या ब्रँड्सकडून सोन्याच्या दागिन्यांवर 50% पर्यंत सूट, कमी किमतीत दागिने खरेदी करण्याची संधी.