Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांच मोठ वक्तव्य – ‘त्या’ महिलांबाबत होणार वेगळा विचार!

2 Min Read
Ladki Bahin Yojana Ajit Pawar Latest Statement

Ladki Bahin Yojana Ajit Pawar Latest Statement: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्त्वाच विधान केल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील अधिवेशनात बोलताना त्यांनी स्पष्ट केल की, ही योजना कायम सुरु ठेवण्यात येणार आहे. मात्र, करदात्या, नोकरदार आणि शेतजमीन असणाऱ्या महिलांबाबत वेगळा विचार केला जाणार आहे.

महायुतीच्या विजयामध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेची मोठी भूमिका!

अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितल की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांसाठीची वीज माफी योजना महायुतीच्या विजयात महत्त्वाची ठरली. त्यांनी या दोन्ही योजनांचे महत्त्व अधोरेखित करत सांगितल की, महिलांपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले.

‘त्या’ महिलांबाबत वेगळा विचार – कोणाला मिळणार लाभ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरूच राहणार असली तरी योजनेत काही बदल करण्याचा विचार सुरू आहे. अजित पवार यांनी स्पष्ट केलं की, श्रीमंत महिलांना, ज्यांचे आयकर भरणे सुरू आहे किंवा ज्यांच्याकडे ऊस शेती आहे, अशा महिलांना या योजनेतून वगळण्याचा विचार केला जात आहे. यामुळे योजना खरच गरजू महिलांपर्यंत पोहोचेल.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा; हजारो महिलांचे बोगस अर्ज उघड, सरकारला लाखोंचा फटका.

सरकारचा उद्देश – योजना गरजू महिलांपर्यंत पोहोचवणे!

अजित पवार यांनी सांगितल की, लाडकी बहीण योजनेचा उद्देश गरजू महिलांना आर्थिक स्थैर्य देण आहे. त्यामुळे फक्त गरजू महिलांनाच मदत मिळावी, यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे.

महिलांसाठी महत्त्वाचे – सरकारचा मोठा निर्णय लवकरच!

अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता सरकार योजनेत काय बदल करणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागल आहे. मात्र, महिलांनी चिंता करू नये, योजना सुरूच राहणार असल्याच त्यांनी स्पष्ट केल आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठे आरोप, 7 फेब्रुवारीला हायकोर्टात सुनावणी.

Share This Article