लाडकी बहीण योजना बंद होणार? उपमुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा खुलासा Maharashtra Deputy CM Eknath Shinde Ladki Bahin Yojana Update

2 Min Read
Maharashtra Deputy CM Eknath Shinde Ladki Bahin Yojana Update

Maharashtra Deputy CM Eknath Shinde Ladki Bahin Yojana Update : महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्वाची असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. यावर 4 फेब्रुवारी 2025 रोजी, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा खुलासा केला. त्यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात स्पष्ट सांगितल की, लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद केली जाणार नाही. राज्य सरकार महिलांच्या कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

महिलांना मिळत राहील आर्थिक मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, महायुती सरकार महिलांसाठी असलेल्या लाडकी बहीण योजनेला कुठलाही अडथळा येऊ देणार नाही. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. काही महिलांना तांत्रिक अडचणीमुळे अद्याप हप्ता मिळाला नसल्याने अफवा पसरल्या होत्या की ही योजना बंद केली जाणार आहे. मात्र, सरकारने यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे.

🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana Verification 2025: फेब्रुवारी अखेरीस पूर्ण होणार चौकशी, ‘अशी’ आहे पडताळणी प्रक्रिया.

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) महायुती सरकारमध्ये समावेश आहे. शिंदे यांनी सांगितले की, सरकारची जबाबदारी वाढली आहे आणि इथून पुढे लोकांसाठी अधिक चांगल्या योजना राबवण्यावर भर दिला जाईल.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेच्या नियमांच टीव्हीवर प्रसारण.

गृहनिर्माण प्रकल्पांबाबत मोठ आश्वासन

यावेळी त्यांनी राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पांबद्दलही मोठ विधान केल. मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर ठिकाणचे रखडलेले प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यात येतील. काही प्रकल्प२५ वर्षांपासून प्रलंबित आहेत, पण आता ते लवकरच पूर्ण केले जातील. क्लस्टर डेव्हलपमेंट योजना ही महाराष्ट्र सरकारची मोठी संकल्पना आहे आणि ती इतर कोणत्याही देशात दिसून येत नाही, अस शिंदे म्हणाले.

राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरली आहे. अनेक महिला या योजनेच्या मदतीने आर्थिक स्थैर्य मिळवत आहेत. त्यामुळे शिंदे यांनी महिलांना आश्वासन दिल आहे की, कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद केली जाणार नाही.

🔴 हेही वाचा 👉 गुंतवणूकदारांना मालामाल करणारी ‘ही’ सरकारी योजना बंद होणार? अर्थमंत्र्यांचा मोठा खुलासा.

Share This Article