‘या’ लाडक्या बहिणींनी केल सरकारच ४५० कोटींच नुकसान! Majhi Ladki Bahin Yojana Ineligible Beneficiaries Update

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Ineligible Beneficiaries Update

Majhi Ladki Bahin Yojana Ineligible Beneficiaries Update : राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत अपात्र ठरलेल्या सर्व महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी ही माहिती दिली आहे. अपात्र ठरलेल्या लाभार्थींना पुढील महिन्यांपासून अनुदान मिळणार नाही. मात्र, जुलै ते डिसेंबर दरम्यान मिळालेली रक्कम परत मागितली जाणार नाही. पण त्यामुळे शासनाला तब्बल ४५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

कोणत्या महिलांना अपात्र ठरवले?

राज्यस्तरावर करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीत लाखो महिलांनी योजनेच्या निकषांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. या महिलांमध्ये –

✔ २.३० लाख – संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी
✔ १.१० लाख – ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला
✔ १.६० लाख – ज्या महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे, ईतर योजनेचा लाभ घेत आहेत किंवा स्वेच्छेने योजनेतून बाहेर पडल्या

चारचाकी वाहनधारक महिलांनाही फटका

सरकारने प्रादेशिक परिवहन विभागाच्या (RTO) मदतीने तपासणी केली. यात अनेक महिलांच्या कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन असल्याचे आढळले. अशा सर्व महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे.

सरकारने अचानक निर्णय का घेतला?

महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात १५०० रुपयांचे अनुदान २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आर्थिक परिस्थिती डळमळीत असल्याने सरकारवर ताण वाढू शकतो. त्यामुळेच योजनेतील अपात्र महिलांना वगळून हा आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

🔴 हेही वाचा 👉 रेशनकार्डवर नाव कायम ठेवायचय? तर मग 28 फेब्रुवारी पूर्वी करा हे काम!.

अपात्र लाडक्या बहिणींना पैसे परत करावे लागणार का?

नाही! अपात्र ठरवलेल्या महिलांकडून जुलै ते डिसेंबरपर्यंत मिळालेले ९,००० रुपये परत मागितले जाणार नाहीत, असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, जानेवारीपासून त्यांना अनुदान मिळणार नाही.

अद्याप लाखो अर्ज प्रलंबित!

माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) एकूण २ कोटी ६३ लाख अर्ज आले होते. त्यापैकी २ कोटी ४१ लाख महिला पात्र ठरल्या. मात्र, अजूनही ११ लाख अर्जांची छाननी सुरू आहे. आधार क्रमांकाशी जोडणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम पात्रता यादी जाहीर केली जाईल.

सरकारचा निर्णय योग्य की अयोग्य?

सरकारच्या या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणींनी ही कारवाई योग्य असल्याचे म्हणले आहे. तर काहीजणींनी अचानक अपात्र ठरवल्याने आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

🔴 नोकरी 👉 इंडियन बँक भरती 2025: बिना परीक्षा नोकरीची संधी, 26 फेब्रुवारीपर्यंत करा अर्ज.

Share This Article