लाडकी बहिण योजना बनली मोठा आर्थिक भार, अनेक योजनांना आणि विकासकामांना अडचणी Ladki Bahin Yojana Impact Maharashtra Economy

2 Min Read
Ladki Bahin Yojana Impact Maharashtra Economy

Ladki Bahin Yojana Impact Maharashtra Economy : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेमुळे (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) महाराष्ट्रातील अनेक विकासकामे अडचणीत आली आहेत. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण येत आहे आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक महत्त्वाच्या योजनांना निधी कमी पडत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने २६ जानेवारी २०२५ पूर्वी लाडकी बहिण योजनेअंतर्गत सुमारे २.५ कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता दिला, ज्यावर ३७०० कोटी रुपये खर्च झाले. मात्र, आता सरकारला आठव्या हप्त्याचा निधी उभा करणे कठीण होऊन बसले आहे.

Maharashtra News : मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाडकी बहीण योजनेमुळे कंत्राटदारांची ८९ हजार कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. जुलै २०२४ पासून कंत्राटदारांना पैसे मिळाले नाहीत. या अडचणीमुळे राज्यातील अनेक विकास कामे आणि शेतकरी योजना थांबवाव्या लागल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारने ७१६ कोटी रुपयांची सबसिडी थांबवली आहे. अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. अशातच कंत्राटदार संघटनांनी सरकारला काम थांबवण्याचा इशारा दिला आहे.

कंत्राटदार संघटनांनी सरकारला ३० जानेवारीला पत्र लिहून बिले थकलेली असल्याचे सांगितले आणि ५ फेब्रुवारीपासून काम थांबवण्याचा इशारा दिला आहे.

🔴 हेही वाचा 👉 ३ फेब्रुवारीला सोन्याने गाठला नवा उच्चांक, चांदीही तेजीत – जाणून घ्या तुमच्या शहरातील दर.

माझी लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) राज्यासाठी मोठा आर्थिक भार बनली असून एका योजनेमुळे अनेक योजनांना आणि विकासकामांना अडचणी येत आहेत. सरकारला कंत्राटदारांच्या थकबाकीचा प्रश्न लवकरच सोडवावा लागणार आहे.

🔴 नोकरी 👉 NTPC मध्ये लेखी परीक्षेविना मिळवा नोकरी, ₹40,000 ते ₹1,40,000 पर्यंत पगार.

Share This Article