Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी ३,६९० कोटींचा निधी मंजूर, ‘इतक्या’ महिलांना मिळणार जानेवारीच्या हप्त्याचा लाभ

2 Min Read
Ladki Bahin Yojana January 2025 Installment News Today

Ladki Bahin Yojana News Today Marathi: महाराष्ट्र सरकारने ‘माझी लाडकी बहिण योजने’अंतर्गत जानेवारी महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता २.४६ कोटी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यासाठी ३,६९० कोटी रुपये मंजूर केले आहेत.

Ladki Bahin Yojana January Installment 2025: महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, “जानेवारीचा हप्ता २६ जानेवारीपूर्वी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल.” राज्य सरकारने यापूर्वी जुलै ते डिसेंबरपर्यंतचे मासिक हप्ते थेट वर्ग केले आहेत.

सध्या फक्त तक्रारींच्या आधारावरच अर्जांची छाननी:

Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi: मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, या योजनेच्या लाभार्थींची छाननी करण्यासाठी अद्याप कोणतीही नवीन मोहीम सुरू केलेली नाही.

“आम्ही कोणत्याही शासकीय धोरणात बदल केलेला नाही. केवळ स्थानिक सरकारी कार्यालयांमध्ये आलेल्या तक्रारींचे निराकरण करत आहोत,” असे त्यांनी सांगितले.

अर्ज अपात्र ठरण्याचे निकष:

  • वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास महिला अपात्र.
  • चारचाकी वाहन असलेल्या महिलांना लाभ मिळणार नाही.
  • राज्याबाहेर विवाह झालेल्या महिलाही अपात्र.
  • आधार कार्ड व बँक खात्यावरील नावामध्ये विसंगती असल्यास महिला अपात्र.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या अफवांचे खंडन केले. “योजना पुढेही सुरू राहील आणि कोणतेही नवे निकष लागू करून खऱ्या गरजू महिलांना अपात्र ठरवले जाणार नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

  • सध्या अर्जाची छाननी फक्त आलेल्या तक्रारीच्या आधारे होत आहे.
  • राज्य सरकारने योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी कायम ठेवण्यावर भर दिला आहे.
  • २.४६ कोटी महिलांना हप्त्याचा लाभ मिळणार.

🔥 लेटेस्ट अपडेट 👉 26 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 जमा, फेब्रुवारी हप्त्याबाबत नियोजन सुरू.

‘माझी लाडकी बहिण योजना’ (Ladki Bahin Yojana Maharashtra) महिलांसाठी सरकारचे मोठे पाऊल असून, सरकारकडून सर्व लाभार्थ्यांना वेळेत आर्थिक मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

🔥 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरेंची मोठी घोषणा.

Share This Article