Ladki Bahin Yojana Rules Chhagan Bhujbal Advice Maharashtra Government : राज्यातील “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने”बाबत महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आज, 4 फेब्रुवारी 2025 रोजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्य सरकारला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांच म्हणण आहे की, “माझी लाडकी बहीण योजना” (Mazi Ladki Bahin Yojana) या योजनेसंदर्भातील नियम जनतेला स्पष्टपणे कळायला हवेत. त्यासाठी टीव्हीवर नियम प्रसारित करावेत, तसेच वर्तमानपत्रांमध्ये देखील लाडकी बहीण योजनेच्या नियमांची जाहिरात केली जावी.
राज्यातील गरीब महिलांसाठी योजना
छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले की, लाडकी बहीण योजना गरीब महिलांसाठी आहे. “ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहे, त्यांना इतर मदतीची आवश्यकता नाही. ही योजना त्या महिलांसाठी आहे ज्या घरकाम, शेतकाम आणि इतर मोलमाजुरीची काम करत आहेत.” अस छगन भुजबळ म्हणाले.
संभ्रम दूर करणे आवश्यक
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही महिलांना नियम न समजल्यामुळे ते या योजनेच्या लाभाचा फायदा घेऊ शकत नाहीत. यावर छगन भुजबळ यांनी सरकारला सल्ला दिला की, “टीव्हीवर नियम येऊ द्या, जे नियमात बसतील ते मदत घेतील आणि जे नियमात बसत नाहीत त्यांना मदतीपासून वंचित करा.”
लाडकी बहीण योजनेसंदर्भातील दुसऱ्या मुद्द्यावर भुजबळ यांनी सांगितले की, “ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन आहे, आणि तरीही महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल, तरी त्यांच्याकडून आत्तापर्यंत देण्यात आलेले पैसे परत घेण्यात काहीच अर्थ नाही.” पण त्यांना इथून पुढचा लाभ दिला जाणार नाही. त्यांनी स्पष्ट केल की, जर महिलांनी नियमांचे पालन केले असेल तर त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील गरीब महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. आतापर्यंत या योजनेच्या 7 हप्त्यांचे 10500 रुपये महिलांना दिले गेले आहेत. जानेवारी महिन्यात 2 कोटी 40 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे.
🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana Verification 2025: फेब्रुवारी अखेरीस पूर्ण होणार चौकशी, ‘अशी’ आहे पडताळणी प्रक्रिया.
🔴 नोकरी 👉 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती 2025, राज्यातील महिलांसाठी अंगणवाडी सेविका बनण्याची मोठी संधी.