मुंबई | 4 फेब्रुवारी 2025: Ladki Bahin Yojana Verification 2025 – महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाल्याने सरकारने चौकशी सुरू केली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सर्व अर्जांचे पुनरावलोकन पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष घरोघरी जाऊन लाभार्थी महिलांच्या अर्जातील नमूद माहितीचे सत्यापन करणार आहेत.
अर्जांची तपासणी सुरू अपात्र महिलांचे अर्ज रद्द!
राज्यातील महिला व बालविकास विभागाने माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mazi Ladki Bahin Yojana) अर्जांची पडताळणी सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील कोणीही आयकर भरत असल्यास किंवा चारचाकी वाहन असल्यास त्या महिलांना अपात्र ठरवले जाणार आहे. यासाठी परिवहन आणि आयकर विभागाची मदत घेतली जात आहे.
मुंबईतील 22,000 अर्ज बाद!
Mumbai News: सरकारने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार मुंबईतील तब्बल 22,000 अर्ज बाद करण्यात आले आहेत. राज्यातील इतर भागांतील अर्जांचीही तपासणी सुरू आहे.
अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी जाऊन चौकशी!
सरकारने अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन अर्जदारांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
✔️ कुटुंबात चारचाकी वाहन आहे का?
✔️ कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे का?
✔️ महिला इतर कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेत आहे का?
कारवाई टाळण्यासाठी लाभ सोडायचा असल्यास काय करावे?
जर कोणाला योजनेचा लाभ स्वेच्छेने सोडायचा असेल, तर त्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करावा. तसेच, अन्य सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी कोणती योजना निवडायची आहे, याबाबत माहिती द्यावी.
सरकारचा कडक इशारा: अपात्र महिलांवर कारवाई होणार!
सरकारने फसवणूक करणाऱ्या लाभार्थ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस संपूर्ण चौकशी पूर्ण होणार आहे. त्यामुळे अपात्र महिलांना पुढचा हफ्ता मिळणार नाही.
➡️ लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांना पुढील आर्थिक मदत मिळणार नाही.
➡️ सरकार फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे.
➡️ अर्जदारांनी नियमांची पूर्तता करत असल्याची खात्री करावी.
🔴 हेही वाचा 👉 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती 2025, राज्यातील महिलांसाठी अंगणवाडी सेविका बनण्याची मोठी संधी.