महसूल व वन विभाग भरती २०२५ – अधिकृत जाहिरात आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या! Maharashtra Revenue Forest Department Recruitment 2025

2 Min Read
Maharashtra Revenue Forest Department Recruitment 2025

Maharashtra Revenue Forest Department Recruitment 2025 : महाराष्ट्र महसूल व वन विभाग अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ७ मार्च २०२५ पर्यंत अर्ज सादर करावा.

भरतीबाबत संपूर्ण माहिती

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरणाची स्थापना केली आहे. या न्यायाधिकरणात अध्यक्ष, सदस्य (न्यायिक आणि प्रशासकीय) पदांसाठी भरती केली जाणार आहे.

ठिकाण आणि पदसंख्या

  • मुख्य खंडपीठ: बृहन्मुंबई – अध्यक्ष, एक न्यायिक सदस्य, एक प्रशासकीय सदस्य
  • इतर खंडपीठे: पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर – प्रत्येक ठिकाणी एक न्यायिक आणि एक प्रशासकीय सदस्य

अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात पूर्ण वाचूनच अर्ज करावा.

➤ अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता:
📧 jla.revenue@maharashtra.gov.in

➤ अर्ज सादर करण्याचा पत्ता:
🏢 *उप सचिव, कार्यासन ज-१अ, महसूल व वन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२

जाहिरात व अर्जयेथे तपासा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख:
📅 शुक्रवार, ७ मार्च २०२५, दुपारी २ वाजेपर्यंत

  • उमेदवारांनी भरती संदर्भातील अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिकृत जाहिरात नीट वाचूनच अर्ज करावा, कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस sarkarinewsmarathi.in जबाबदार राहणार नाही.
  • अधिक माहितीसाठी महसूल व वन विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

महसूल व वन विभागाच्या भरतीसाठी (Revenue Forest Department Recruitment 2025) इच्छुक उमेदवारांनी ७ मार्चपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन आणि ई-मेलद्वारे सुरू आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा!

🔴 नोकरी 👉 महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आधार सेवा केंद्रात नोकरीची संधी, २८ फेब्रुवारीपर्यंत करा अर्ज!.

Share This Article