PM Dhan Dhanya Yojana 2025: 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा, पात्रता व अर्जाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

2 Min Read
PM Dhan Dhanya Yojana 2025 Farmers Benefits

PM Dhan Dhanya Yojana 2025 Farmers Benefits : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी नुकत्याच सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025 (Budget 2025) मध्ये पंतप्रधान धन-धान्य योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील 100 जिल्ह्यांतील 1.7 कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.

पीएम धन-धान्य योजना काय आहे?

पीएम धन-धान्य योजना प्रामुख्याने कमी उत्पादन असलेल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून ही योजना लागू केली जाणार आहे.

पीएम धन-धान्य योजनेचा मुख्य उद्देश

  • शेती उत्पादन वाढवणे
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे
  • स्थलांतर रोखण्यासाठी ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे
  • महिला, युवा शेतकरी व भूमिहीन कामगारांना प्रोत्साहन देणे

पात्रता व अर्ज प्रक्रिया

  • या योजनेसाठी निवडलेल्या 100 जिल्ह्यांतील अल्पभूधारक शेतकरी पात्र असतील.
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत सरकारी पोर्टलवर लवकरच माहिती जाहीर केली जाईल.

🔴 हेही वाचा 👉 ‘या’ यादीतील लाखो लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र! जाणून घ्या कारण.

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर – केसीसी मर्यादा वाढली

शेतकऱ्यांसाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड (KCC) ची कर्ज मर्यादा ₹5 लाखांपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मर्यादा ₹3 लाख इतकी होती.

धान्य, खाद्यतेल व बियाणांसाठी विशेष योजना

  • राष्ट्रीय खाद्यतेल व बियाणे मिशन सुरू
  • पुढील 6 वर्षांसाठी डाळींसाठी विशेष कार्यक्रम

पंतप्रधान धन-धान्य योजना (PM Dhan Dhanya Yojana 2025) ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मोठी संधी ठरणार आहे. ही योजना शेती उत्पादन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यास मदत करेल.

🔴 नोकरी 👉 महाराष्ट्र पोलीस भरती 2025: 10,000 पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार.

Share This Article