7th Pay Commission: करोडो कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्ता ५६%, होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठ गिफ्ट!

2 Min Read
7th Pay Commission DA Hike February 2025

7th Pay Commission DA Hike February 2025 : केंद्र सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात (DA) वाढ जाहीर करू शकते. फेब्रुवारीच्या अखेरीस या वाढीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, DA ३% वाढून ५६% होऊ शकतो. ही वाढ१ जानेवारी २०२५ पासून लागू असेल.

महागाई भत्त्यात किती वाढ होणार?

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ५३% DA मिळत आहे. सरकार ३% वाढ जाहीर केल्यास DA ५६% पर्यंत जाईल. ही वाढ पेंशनधारकांसाठी (DR) देखील लागू असेल. यामुळे सुमारे १ कोटी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल.

फेब्रुवारीच्या शेवटी होईल घोषणा

  • २६ फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
  • यामध्ये DA वाढीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
  • २८ फेब्रुवारीला पंतप्रधान किसान सन्मान निधीची 19 वा हफ्ता जाहीर होईल.
  • त्यामुळे होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठ गिफ्ट मिळू शकत.

🔴 हेही वाचा 👉 SBI ची खास योजना: फक्त 400 दिवसांतच बनवेल श्रीमंत, 31 मार्च 2025 पर्यंत संधी!.

DA वाढीचा इतिहास

  • मार्च २०२४: ४% वाढ, DA ५०% पर्यंत पोहोचला.
  • ऑक्टोबर २०२४: ३% वाढ, DA ५३% पर्यंत गेला.
  • फेब्रुवारी २०२५: ३% वाढ होण्याची शक्यता, DA ५६% होईल.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की, कोरोना महामारीच्या काळात रोखलेला १८ महिन्यांचा DA सरकार देणार नाही.

केंद्र सरकारच्या या निर्णयावर सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. होळीपूर्वी महागाई भत्त्यात वाढ होईल का, यावर लवकरच अंतिम निर्णय होणार आहे.

🔴 नोकरी 👉 महाराष्ट्र पोलीस भरती 2025: 10,000 पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार! Maharashtra Police Bharti 2025.

Share This Article