मुंबई, ८ फेब्रुवारी २०२५: High Security Number Plate Maharashtra – राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत जुन्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक केले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) मुंबई (मध्य) यांनी वाहनधारकांना ही प्लेट लावण्याचे आवाहन केले आहे.
जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट का आवश्यक?
Rto New Rules 2025 : १ एप्रिल २०१९ नंतरच्या सर्व नवीन वाहनांवर केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ अन्वये ही प्लेट बसवण्यात येते. यामुळे वाहनांची सुरक्षितता वाढते, चोरी व बनावट नंबर प्लेटच्या घटनांना आळा बसतो आणि वाहन ओळख अधिक सोपी होते.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयानेही २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी ही प्लेट अनिवार्य करण्याचे आदेश दिले आहेत.
कुठे आणि कसे करावे HSRP बुकींग?
मुंबई (मध्य) आरटीओसाठी Real Mazon India Limited ही अधिकृत एजन्सी आहे. वाहनधारकांनी https://hsrpmhzone2.in या पोर्टलवर जाऊन अपॉइंटमेंट बुक करावी आणि नंबर प्लेट बसवून घ्यावी.
ही नंबर प्लेट कुणी बसवावी?
- १ एप्रिल २०१९ पूर्वीची सर्व दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहने
- मुंबई (मध्य) आरटीओच्या कार्यक्षेत्रातील किंवा इतरत्र नोंदणीकृत, पण या भागात वापरली जाणारी वाहने
तक्रार कशी करावी?
वाहनधारकांना नंबर प्लेट बसवण्यास अडचण आल्यास संबंधित सेवापुरवठादाराच्या पोर्टलवर किंवा आरटीओ कार्यालयात तक्रार दाखल करता येईल.
महत्त्वाचे
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या वाहनावर HSRP बसवून घ्या आणि दंड टाळा!
🔴 नोकरी 👉 पवित्र प्रणाली शिक्षक भरती 2025: अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या सविस्तर माहिती.