Ladki Bahin Yojana January Hafta: सस्पेंस, लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार?

3 Min Read
Ladki Bahin Yojana January Payment When Will Women Receive 1500

Ladki Bahin Yojana January Installment Date Maharashtra: मकर संक्रांत होऊन दोन दिवस झाले तरी देखील अजूनही लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हफ्ता जमा झाला नाही. जानेवारी महिन्याच्या हफ्त्याबाबत काय अपडेट आहे ते जाणून घेऊयात…

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) या योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या 1500 रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये या योजनेची सुरुवात केली, आणि त्यानंतर राज्यातील करोडो महिलांना 6 महिन्याच्या हप्त्यांचे एकूण 9000 रुपये मिळाले आहेत.

आता, महिलांना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळेल, याबद्दल सस्पेंस निर्माण झाला आहे. राज्य सरकारने डिसेंबर 2024 मध्ये 2 कोटी 52 लाख महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचा हफ्ता पाठवला होता, परंतु जानेवारीच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही निश्चित माहिती देण्यात आलेली नाही.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशाच महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. परंतु अनेक महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असूनही त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे, घरात चारचाकी वाहन असूनही महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहे, अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. आणि महिला व बालकल्याण विभागाकडून संबंधित जिल्ह्यांना मिळालेल्या तक्रारिंची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार अपात्र महिलांची नावे पात्र महिलांच्या यादीतून वगळण्याचे काम सुरु आहे.

🔥 लेटेस्ट अपडेट 👉 लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आदिती तटकरेंची मोठी घोषणा.

महत्वाचे आश्वासन: 2100 रुपयांचा हप्ता मार्चनंतर?

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींच्या हप्त्यात वाढ करून 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अर्थसंकल्प सादर करताना यावर विचार केला जाईल असे सूचित केले आहे. त्यामुळे, मार्च 2025 च्या अर्थसंकल्पानंतर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

🔥 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट जाणून घ्या.

छगन भुजबळ यांचे वक्तव्य: ‘नाव काढून घ्या’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले. ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) पात्र नाहीत, त्यांनी स्वत:हून आपले नाव कमी करून घ्यावे, अन्यथा दंडासह वसुली केली जाईल असे सांगितले. यावर विरोधी पक्षांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा

महिलांना या महिन्याचा हप्ता कधी मिळेल, यासाठी राज्य सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. राज्यभरातील महिलांची उत्सुकता वाढलेली आहे आणि महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. (Ladki Bahin Yojana January Installment) जानेवारीच्या हफ्त्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होईल अशी अशा आहे.

🔥 हेही वाचा 👉 नागरिकांना ९९% शासकीय सेवा मोबाईलवर उपलब्ध होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा.

Share This Article